Wednesday, 5 September 2012

थोडीशी कविता लिहण्याचा प्रयत्न करतीय ...KRK


किती माणस यायची,किती माणस जायची 
ह्याची मला भान नसायची ....
कारण 
तीच मला फक्त आपली वाटायची 
म्हणूनच तिच्यासोबत मी फिरायची  ...

जरा उशीर झाला तरी ती रुसून जायची 
पण थोड्या वेळाने परत यायची ..
कारण,
तिला माहित होते ,
तिच्यावाचून कॉलेजला जाने कठीण होते  ...

कधी  कधी  तर ती माझी परीक्षा घ्यायची 
मी समोर दिसून सुद्धा ,थांबत नसायची 
पण तरी मी  तिची वाट बघायची ....

कोलेज् सुटल्यावर परत एकदा तिची आठवण यायची 
मन तिला भेटण्यास आतुर व्हायचे ....

चार वर्षे तिच्या सोबत कशी गेलीत हे कळलेच नाही ..
आता मात्र फक्त तिची आठवणच राहिली ...

अशी ती आमची सर्वांची लाडकी कागल रंकाळा कागल ....S.T  (KRK)                                             
                                         


हिरवा निसर्ग हा भवतीने        --मयूर पेट्रोल पंप 
कॉलेज सफर करा मस्तीने.........

No comments:

Post a Comment

Cool Blue Outer Glow Pointer