Tuesday, 21 April 2015

अंगाई गीते

अंगाई गीते 


पंखा फिरतो गरा गरा
वारा देतो भरा भरा


खबडक  खबडक  घोडोबा 
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करताय कोण
आजी आजोबा मावश्या दोनटाळ्या बाई टाळ्या
पुरणाच्या पोळ्या
एक पोळी करपली
दुधासंगे कुस्करली
दुध झाले कडू
बाळाला आले रडूए ग गाई गोठयात
बाळाला दुध दे वाटीत
बाळाचे दुध मांजर चाटी
मांजर गेले रागाने तिकडच खाल्ले वाघाने
वाघ मामा ओरडतो अस्वल मामी पोळ्या करते .
मुलांनी पोळ्या खाल्या चटाचट
झाडावर चडले पटापट


मोरा रे मोरा
काय तुझा तुरा
एक पाय दुमडून ,
पिसारा फुलवून
नाच तर खरा
मोरा रे मोरा


पोपट किती गोड गोड
खातो पिरू ची फोड फोड


हत्ती हत्ती मोठा किती
मुंगी मुंगी लहान किती
हत्तीच्या कानात शिरली बया
हत्ती नाचतो थया थया


करंगळी मरंगळी चाफेकळी अंगठा ,कोपरा ,खोपरा
करंगळी   आलं आलं आलं आलं … गुदुगुदु गुदुगुदु


कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे ?
हे माझ्या बाळाचे
कोणाचे ग कोणाचे लाल लाल ओठ कोणाचे?
हे माझ्या बाळाचे
कोणाचे ग कोणाचे गुब्बू गाल कोणाचे ?
हे माझ्या बाळाचे...
अडूगल मडूगल सोन्याच कडूगळ
रुपयाचा वाला तान्ह्या बाला
तीट लाऊ …
तीट लाऊ …

No comments:

Post a Comment

Cool Blue Outer Glow Pointer