Tuesday, 21 April 2015

छान छान मनीमाऊ चे बाळ कसे गोरे गोरे पान (chan chan manimauche )

छान छान छान मनीमाऊ चे बाळ कसे गोरे गोरे पान
मनीमाऊ चे बाळ कसे गोरे गोरे पान
इवलीशी  जीवली अन इवलेशे दात

चुटू चुटू खाते कसा दुध आणि भात
इवले इवले डोळे इवले इवले दात
छान छान छान मनीमाऊ चे बाळ कसे गोरे गोरे पान

इवलाश्या पाया मध्ये इवलासा चेंडू
फेकता मी घ्याया धावे दुडूदुडू
 इवलाश्या शेपटीची झाली कमाल
छान छान छान मनीमाऊ चे बाळ कसे गोरे गोरे पान

आली आली मनी माऊ दूर जरा जाऊ
बाळाची मजा सारी दुरूनीया पाहू
आईशी बाल खेळ विसरुनी भान
छान छान छान मनीमाऊ चे बाळ कसे गोरे गोरे पान

No comments:

Post a Comment

Cool Blue Outer Glow Pointer