१]प्रश्न असा आहे कि उत्तर काय :-दिशा
२]एवढस कार्टं घर कसं राखतं :-कुलूप
३]इथेच आहे पण दिसत नाही :-वारा
४]दोन भाउ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी :-डोळे
५]पांढरं पातेल पिवळा भात :-अंड
६]तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला :-लवंग
७]सुपभर लाह्या त्यात एक रुपया :-चंद्र आणि चांदण्या
८]हिरवी पेटी काट्यात पडली,उघडून पाहिली तर मोत्याने भरली :-भेंडी
९]तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई :-चूल आणि तवा
१०]तीनजण वाढायला बाराजण जेवायला :-घड्याळ
११]पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब :- कणीस
१२]पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं ,कात नाहि,
चुना नाही, तरी तोंड कसं रंगल:- :-पोपट
१३]काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला: - कापुस
१४]काट्याकुट्यांचा बांधला भारा,कुठं जातोस ढबुण्या पोरा :- फणस
१५]पुरूष असून पर्स वापरतो,वेडा नसून कागद फाडतो :-कंडक्टर/ बस वाहक
१६]कुट कुट काडी पोटात नाडी,राम जन्मला हात
जोडी कृष्ण जन्मला हात जोडी :-देवर्यातील घण्टी / टाळ.
१७]हजार येती हजार जाती हजार बसती पारावर,अशी नार
ती जोराची हजार घेती ऊरावर :-बस / ट्रेन.
१८]एवढीशी नन्नुबाय,सार्या वाटनं गीत गाय :-शिट्टी
१९]कोकणातनं आली नार,तिचा पदर हिरवागार,तिच्या काखेला प्वार :-काजू (फळासकट)
२०]कोकणातनं आली सखी,तिच्या मानंवर दिली बुक्की ,तिच्या घरभर लेकी- लसूण
२१]कोकणातनं आला भट ,धर की आपट :- नारळ
२२]कांड्यावर कांडी सात कांडी,वर समुद्राची अंडी :- ज्वारीचे कणीस
२३]मुकूट याच्या डोक्यावर,जांभळा झगा अंगावर :- वांग
२४]आटंगण पटंगण लाल लाल रान,अन् बत्तीस पिंपळांना एकच पान :- तोंड (दात आणि जीभ)
२५]कोकणातनं आला रंगूकोळी, त्यानं आणली भिंगू चोळी,शिंपीण म्हणते शिवू कशी,परटीण म्हणते धुवू कशी,अन् राणी म्हणते घालू कशी :- कागद
२६] सोन्याची सुरी भुईत पुरी,वर पटकार गमजा करी :- गाजर
२७]सगळे गेले रानात,अन् झिपरी पोरगी घरात :-केरसुणी
२८]थई थकड धा.. तीन डोकी पाय धा.... :- दोन बैल, नांगर आणि एक माणूस (शेत नांगरणारा)
२९]लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे
पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही :-लालकृष्ण आडवाणी
पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही :-लालकृष्ण आडवाणी
३०]आहे मला मुख,परंतु खात नाही,दिसते मी झोपलेली,पण असते पळतही,माझ्या शिवाय तुमचे,जगणेच शक्य नाहीवहा तुम्ही माझी,थोडीशी कळजीही,
मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून :- नदी
लप लप काठी सोन्याची पेटी मीच एकटी 100 धाकटी
ReplyDeleteYear
ReplyDeletecalendar
ReplyDeleteKutkut Kati che
ReplyDeleteAnswer chuckle ahe
calendar
ReplyDeleteआजीबाईच्या शेतात म्हणजे या जीवनात, एक कणीस म्हणजे एक वर्ष आणि त्यात तीस-एकतीस दाणे म्हणजे..
ReplyDelete‘..म्हणजे या कोडय़ाचे उत्तर वर्ष, महिने, दिवस-रात्र
Hath ahe pn halvat nhi
ReplyDeleteSup bhar lhaya jyat ek rupya sanga mi kon???
ReplyDeleteChandra n chandanya
DeleteChandr ani chandni
Deleteतीन भाऊ वर्षाच एकदा येतात सार्या जगाला आनंद देऊन जातात .......
ReplyDeleteKaay
Delete��������
DeleteAns plz
Deleteऋतू
Deleteऋतू
Deleteऋतू
DeleteAndharya kholit mhatari meli tila uchlayla char jan geli..
ReplyDeleteAns sanga
काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली
Deleteतपकीर
Deleteशेंबूड🙄
Deleteकोकणातनं आली सखी,
ReplyDeleteतिच्या मानंवर दिली बुक्की,
तिच्या घरभर लेकी
लसुण
Deleteमाझ्या ट्युशनच्या एका विद्यार्थ्यांनी एक कोडं विचारलं--
ReplyDeleteएक नवीनच माणूस गावात आला होता.समोरून एक लहान मुलगी येतहोती त्याने तिला विचारले--
1 तुझे नाव काय?2 तु कुठे चाललीस?
दोन्ही प्रश्नांचे तिने एकाच शब्दात उत्तर दिले.
तो शब्द काय?1 मिनिटात ओळखले तर genius
शीला
DeleteCalendar
ReplyDeleteकाळं खडक, पिवळं पाणी, आत पोहते चंदाराणी.
ReplyDeleteआई,मावशी,काकू,आजी ,पणजी कुणाचीही मदत घेतली तरी चालेल.
ReplyDeleteओळखा
पण पासिंग मात्र ६ ठरलंय .
१. काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहते चंदाराणी =
२. काळी काठी,तेल लाटी,वाकते पण मोडत नाही =
३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणी पितो गंगाराम =
४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी =
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली =
६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे =
७. सुपभर लाह्या,मधे रुपय्या =
८. घाटावरून आला भट,त्याचा काष्टा घट =
९. आकाशातून पडली घार,रक्त प्याले घटाघटा,मांस खाल्ले पटापटा =
१०. एवढसं पोर,घर राखण्यात थोर =
११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी =
१२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले,हाती नाही लागले =
१३. पाऊस नाही,पाणी नाही,रान कसं हिरवं,कात नाही,चुना नाही,तोंड कसं रंगलं =
१४. लहानसे झाड,त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा =
१५. जांभळा झगा अंगावर,मुकुट घालते डोक्यावर =
१६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान =
१७. हरण पळतं,दूध गळतं =
१८. आठ तोंडे,जीभ नाही,गाणे मात्र सुरेल गाई =
१९. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय =
२०. वीस लुगडी,आतून उघडी =
२१. सरसर गेला साप नव्हे,गडगड गेला गाडा नव्हे,गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे =
उंच बाप झिपरी आई तीन टकली पोर कोड्याचे उत्तर
ReplyDeleteAns plz
DeleteAns plz
DeleteWhat is ans
Deleteनारळाचे झाड?
DeleteCoconut tree
Deleteनारळाचे झाड भावा
Deleteतीन पायाची त्रिंबक रानी खाते लाकूड पिते पाणी
ReplyDeleteओळखा पाहू काय आहे ते?
एवढस झाड ..
ReplyDeleteत्याला घुंगराचा भार......
सांगा याचं उत्तर.....
2 केस
ReplyDelete3 समई,
4 डोळे
5 शेम्बुड
6 दात आणि जीभ
7 चंद्र आणि चांदन्या
8 कांदा
9 नारळ वरुण पडतो,पानी पितो, खोबर खातों
10 कुलुप
11 पक्कड (सानशी)
13 पोपट
15 वांगे
16 तोंड, दात ,जीभ
17 जात
2 केस
ReplyDeleteतीन पायांची तिपाई,
ReplyDeleteवर बसला शिपाई
उत्तर: सांगा
रिक्षा (auto)
Deleteतवा आणि चूल
Deleteसान
ReplyDeleteतार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले,हाती नाही लागले
ReplyDelete१) कढई, तेल, पुरी
ReplyDelete२) डोक्यावरचे केस
३)सम ई, तेल, वात
४)डोळे
५)
६)दात व जीभ
७) चंद्र व चांदण्या
८)कांदा
९) नारळ
१०)कुलूप
११) पक्कड
१२)उंबराचे फुल
१३)पोपट
१४)ओवा
१५) वांग
१६)जीभ
१७)जात
१८)बासरी
१९)कोल्हापुरी चप्पल
२०)कणिस
२१)पाण्याची धार
2 केस
ReplyDelete3 समई - वात
4 डोळे
5 शेम्बुड, तपकीर
6 तोंड (दात आणि जीभ)
7 चंद्र आणि चांदन्या
8 कांदा
9 नारळ वरुण पडतो,पानी पितो, खोबर खातों
10 कुलुप
11 पक्कड (सानशी)
13 पोपट
15 वांगे
16 तोंड (दात ,जीभ)
17 जाते
18 बासरी
20 लसणीचा कांदा
21 विहिरीवरील रहाट
सातासुमुद्रापलिकडे राणीने केला भात एक एक शीत नऊ नऊ हात --- उत्तर काय?
ReplyDeleteसातासुमुद्रापलिकडे राणीने केला भात एक एक शीत नऊ नऊ हात--- उत्तर काय?
ReplyDelete