Showing posts with label Songs. Show all posts
Showing posts with label Songs. Show all posts

Wednesday, 3 July 2013

सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे


सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे /sur tech chedita


सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे 
आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे 

 अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमल
ली वेदना सुखावली, हासली तुझ्यासवे 

 एकटा तरी स्मृती, तुझ्याच या सभोवती 
बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे

मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे



मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे /  Man Udhan Varyache, Guj Pavsache /


मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते 
मन उधाण वार्‍याचे, 
गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते 

आकाशी स्वप्‍नांच्या हरपून भान शिरते
 हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते 
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ? 
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
 मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
 अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते 

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
 कधी गहिर्‍या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
 तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ? 
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
 जाणते जरी हेपुन्हा पुन्हा का चुकते ?
 भाबडे तरी भासांच्या मागून पळते

Friday, 11 January 2013

लई भारी माझी कोल्हापुरी ...!!!

बदलत्या जीवनातील आपुलकी कोल्हापूर
माणसाच्या मनातील माणुसकी कोल्हापूर ...!

शिवाजी राजांचे मर्द मराठे कोल्हापूर
झणझनित तांबड्या कटाची मिसळ कोल्हापूर ...!

पन्हाला गडाची तळपती तलवार कोल्हापूर
मारादानी खेळतात जिगर कोल्हापूर ...!

दख्खनचा राजा जोतिबाच गुलाल ,खोबर कोल्हापूर
महाराष्ट्रीयाच्या कलाकारांचे कलानगर कोल्हापूर ...!

राजश्री शाहुंचे आशीर्वाद कोल्हापूर
आई अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर ...!

रंकाळ्याचा बेधुंद गारवा कोल्हापूर
गुळाचं रसाळ गोडवा कोल्हापूर ...!

रणरागिणी ताराराणी मधील वाघीण कोल्हापूर
क्रिकेट वां फुटबाल वा हॉकीचे शोकीन कोल्हापूर ...!

खासबाग चे मर्दानी कुस्ती कोल्हापूर
मिरवणुकीच्या डान्स ची मस्ती कोल्हापूर ...!

करवीर नगरी दक्षिण काशीतील शक्ती कोल्हापूर
गावाकडच्या मातीतील भोळी भाबडी भक्ती कोल्हापूर ...!

राजारामपुरीच झगमगीत कोल्हापूर
शिवाजीपेठेच झणझणीत कोल्हापूर ...!

पंचगंगेचा प्राचीन घाट कोल्हापूर
मनान,शरीरान राजेशाहीचा थाट कोल्हापूर ...!

शाहिरांचा तडफदार बाज कोल्हापूर
दागिन्यात कोल्हापुरी साज कोल्हापूर ...!


चित्रपट सृष्टीची सुरवात कोल्हापूर
लावणीतील दिलकश नजाकत कोल्हापूर ...!

चपलानपासून फेट्यापर्यंत मातीच अस्सल स्वाभिमान कोल्हापूर
तांबड्या सफेद रस्स्यातील चरचरीत मटन कोल्हापूर ...!

गावरान शिव्यातील रंगद प्रेम कोल्हापूर
राजकारणातील खुन्नस कोल्हापूर ...!


राकट मनाचे प्रेमळ अन दिलदार कोल्हापूर
दादागीरीमधील काटाकीर्र कोल्हापूर ...!

लवंगी मिरचीचा ठसका कोल्हापूर
दुध कट्ट्यावरच आकडी दुध कोल्हापूर ...!

सगळ्या जगाला हेवा वाटावा असे नादखुला फक्त नि फक्त कोल्हापूर
ऐवढ असूनही तनान आणि मनान अस्सल भारतीय कोल्हापूर ...!

जेव जेव भरपूर ,उत्तम ,सुंदर नि पुरेपूर
ते ते लई भारी माझ कोल्हापूर ...!
"भावा!!!... नाद नाही करायचा ......!"


Wednesday, 19 December 2012

कणा



ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कवी - कुसुमाग्रज






                                      




Saturday, 3 November 2012

राष्ट्रगीताचा अर्थ मराठी आणि इंग्लिश मध्ये


                              कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी रवींद्रनाथ टागोरांनी ‘जन गण मन’ या प्रार्थनागीताचं गायन केलं. राष्ट्रगीत हे  बंगाली भाषेत लिहिलेलं आहे 

राष्ट्रगीताचा अर्थ :-

"जन-गनाच्या मनाचा अधिनायक असलेल्या हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा)

तुझा जयजयकार असो !!!

पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रावीड, उत्कल, वंग (हे प्रदेश आणि )

विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा आणि उसळणारे सागर

( थोडक्यात जमीन, पर्वत, नद्या, सागर सर्व )


तव शुभ नामे गाहे, आणि तव शुभ आशिष मागे !!!

आणि वर गाहे तव जय गाथा !!!!

जन-गणासाठी मंगलदायका, हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा) जय हे॥ ( तुझा जयजयकार असो !!!)

जय हे, जय हे, जय हे... ( त्रिवार जयजयकार) जय जय जय जय हे !!!!!!( असंख्य वेळा जयजयकार असो !!!)
                       

Translation of The national anthem- Jana Gana Mana In English

                                                                जन -गण -मन 

Thou Art the Ruler of All Minds

Thou are the ruler of the minds of all people, dispenser of India's destiny.

The name rouses the hearts of Punjab, Sind, Gujurat and Maratha. Of the Dravid and Orissa and Bengal.

 It Echoes in the hills of Vindhyas and Himalayas, mingles in the music of Yamuna and Ganga and is chanted by the waves of the Indian Sea.

 They pray for your blessing and sing thy praise. The salvation of all people is thy hand, thou dispenser of India's destiny. Victory, Victory, Victory to thee.





जय हो ...


ओळख


संपूर्ण अनोळख्या ठिकाणी  एक ओळखीची हाक ,
वेगळाच  आनद देऊन जाते ,
आणि
सर्वजन ओळखीचे असून सुद्धा ,कोणाशीतरी बोलन न होण
हे एक वेगळच दुख असत ..




                                           




Friday, 2 November 2012

आठवणी


आठवणी,
जश्या मला येतात तश्या त्या लोकांना पण येत असतील का ?
असतील अथवा नसतील ..
मग
कधी न विसरणाऱ्या  पण विसरू वाटणाऱ्या आठवणी विसरायच्या कश्या ??..





अश्याच आठवणी ..आठवण करून देणार हे सुरेख गाण ..
फूलों के रंग से, दिल की कलम से, तुज को लिखी रोज पाती
कैसे बताऊ किस किस तरह से, पल पल मुझे तू सताती

तेरे ही सपने लेकर के सोया, तेरे ही यादों में जागा
तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे के माला में धागा

बादल बिजली चन्दन पानी, जैसा अपना प्यार
लेना होगा जनम हमे कई कई बार
इतना मदीर, इतना मधुर तेरा मेरा प्यार
लेना होगा जनम हमे कई कई बार

साँसों की सरगम  धड़कन की बीना, सपनों की गीतांजली तू
मन की गली में महके जो हरदम ऐसी जूही की कली तू
छोटा सफ़र हो, लंबा सफ़र हो, सूनी डगर हो या मेला
याद तू आये, मन हो जाए, भीड़ के बीच अकेला
बादल बिजली चन्दन पानी, जैसा अपना प्यार.. ..

पूरब हो पश्चिम  उत्तर हो दक्षिण   तू हर जगह मुस्कुराये
जितना ही जाऊ मैं दूर तुझ से, उतनी ही तू पास आये
आंधी ने रोका, पानी ने टोका, दुनिया ने हसकर पुकारा
तसवीर तेरी लेकिन लिए मैं, कर आया सब से किनारा
बादल बिजली चन्दन पानी, जैसा अपना प्यार.. ..

Wednesday, 5 September 2012

थोडीशी कविता लिहण्याचा प्रयत्न करतीय ...KRK


किती माणस यायची,किती माणस जायची 
ह्याची मला भान नसायची ....
कारण 
तीच मला फक्त आपली वाटायची 
म्हणूनच तिच्यासोबत मी फिरायची  ...

जरा उशीर झाला तरी ती रुसून जायची 
पण थोड्या वेळाने परत यायची ..
कारण,
तिला माहित होते ,
तिच्यावाचून कॉलेजला जाने कठीण होते  ...

कधी  कधी  तर ती माझी परीक्षा घ्यायची 
मी समोर दिसून सुद्धा ,थांबत नसायची 
पण तरी मी  तिची वाट बघायची ....

कोलेज् सुटल्यावर परत एकदा तिची आठवण यायची 
मन तिला भेटण्यास आतुर व्हायचे ....

चार वर्षे तिच्या सोबत कशी गेलीत हे कळलेच नाही ..
आता मात्र फक्त तिची आठवणच राहिली ...

अशी ती आमची सर्वांची लाडकी कागल रंकाळा कागल ....S.T  (KRK)



                                             
                                         


हिरवा निसर्ग हा भवतीने        --मयूर पेट्रोल पंप 
कॉलेज सफर करा मस्तीने.........





Thursday, 14 June 2012

मनाचे विचार


आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला भरपूर प्रेम द्या ,पण ती व्यक्ती 


आपल्यावर तितकेच प्रेम करेल अशी अपेक्षा बाळगू नका. 




                                                       


कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू ................
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात .......




थोडीशी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतीय ....

फोन Memory मधून त्यांचा नंबर delete केला पण
brain  Memory  मधून कसे delete करू...

कॉम्पुटर मधून फोटो delete केला पण
डोळ्यामधल्या त्या प्रतिबिंबाला कसे delete करू...

गर्दीत हरीविलेली/विसरलेली  मी ...
त्यांना कशी विसरू ...




Cool Blue Outer Glow Pointer