संदीप खरे :-गाणी

संदिप खरे यांच्या “नसतेस घरी तु जेव्हा” या कवितेवर आधारीत IT वर्जन  

नसतेस ऑनलाईन तु जेव्हा
जीव तुटका तुटका होतो

जी-टॉक चे विरती धागे                      
ऑर्कुट फाटका होतो ॥धृ॥

डिस्क फाटुन क्रॅशच व्हावी
कल्लोळ तसा ओढवतो
चॅटींग दिशाहीन होते
अन लॅन पोरका होतो ॥१॥

येतात ई-मेल दाराशी
हिरमुसून जाती मागे
विंडोशी थबकुन कर्सर
तव मेसेजवाचुन जातो ॥२॥

लघु लिपीत खेळवणाऱ्या
त्या स्माईली स्मरती सगळ्या                 

प्रॉक्सी-विन नेट अडावे
मी तसाच अगतीक होतो ॥३॥

तु सांग सखे मज काय
मी सांगु या स्टेटस लाईन्सना
माऊसचा जीव उदास
माझ्यासह क्लिक-क्लिक करतो ॥४॥

ना अजुन झालो ऍलोकेट
ना बिलेबल अजुनी झालो
तुजवाचुन पिंगींग राहते
तुजवाचुन मेसेंजर अडतो ॥५॥



--हे भलते अवघड असते  http://www.dhingana.com/sandeep-khare-playlist-songs-23b6209

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना                    
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते                
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...

कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते..

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….  


--आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो / Atasha Mi Fakt Rakane

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज  कुठलाही अन ताप नको आहे
उत्तर कुठले ?मुळात मजला प्रश्न नको आहे
ह्या प्रशांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांनी छळू नये मजला
बधिरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भीती साठवते
डोंगर बघता उची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्र हि उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने कलान्दारीची  गीते मी रचतो

कळून येत जगण्याची या इवलीशी त्रिज्या
उडून जिती अत्तरापरी जगण्याची मौजा
दरी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येते सद्देव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो.


--मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !

मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !

डोळ्यांत माझिया सूर्याहूनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !

मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या
अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपिसापरी दिसतो !!



--क्षितिजाच्या पार वेड्‌या संध्येचे घरटे

क्षितिजाच्या पार वेड्‌या संध्येचे घरटे
वेड्‌या संध्येच्या अंगणी रात थरथरते
कुणी जा दूर तशी मनी हूरहूर
रात ओलावत सूर वात मालवते...

आता बोलायाला कोण संगे चालायाला कोण
कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंबलोण
पायरीला ठसे दार खुले छत पिसे
कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते...

आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हातांनी
आणि आभाळाचे गूज चंद्र सांगेल खुणांनी
पडतील कुणी पुन्हा भरतील डोळे
पुन्हा पुसतील पाणी हात थरथरते...

मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके
त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके
भिजलेली माती त्याचे हललेले मूळ
त्याचे क्षितिजाचे कूळ त्या चालवते...


सांज अबोला अबोला सांज कल्लॊळ कल्लॊळ
सांज जोगीण विरागी सांज साजीरी वेल्हाळ
सांजेवर फूल गंध मौनाचा हवेत
दूर लागले गावात दीप फरफरते...





1 comment:

  1. मला वाटते की तू संदीप खरेचि फ्यान अहेस

    ReplyDelete

Cool Blue Outer Glow Pointer